Now Loading

आटपाडी-सांगली मेन रोड येथे आर.पी.आय (आठवले)च्या  वतीने रस्ता रोको आंदोलन

आटपाडी दि.०२/११/२०२१ *आटपाडी-सांगली मेन रोड येथे आर.पी.आय (आठवले)च्या  वतीने रस्ता रोको आंदोलन संपन्न* *एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सांगली जिल्ह्यात चक्काजाम करणार-जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात* *आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने एस.टी. महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी रिपाईच्या कार्यकर्त्यांनी आटपाडी येथे एसटी स्टँड समोर रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आले.* *यावेळी आंदोलन करताना राजेंद्र खरात साहेब यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या महाविकास आघाडी सरकारने मान्य कराव्यात व अनेक जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झालेत त्या सर्व कुटुंबांना महा विकास आघाडी सरकारकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावे व ही दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास आनंदाने साजरी व्हावी. अशी मागणी महाविकास आघाडी सरकारला माध्यमांशी बोलताना यावेळी दिली. व दोन-तीन दिवसात गेली तीस वर्षे एस.टी कर्मचारी आपली सेवा देतात एकमेव सेवा अशी आहे की सतत आठ तास ड्यूटी करावी लागते त्यांना जर नाही न्याय मिळाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राजेंद्र खरात साहेब यांनी दिला.*  *व आंदोलन स्थळी आटपाडी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक गोसावी साहेब यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून वरती कळवतो असे आश्वासन दिले.त्यानंतर तातपूरते आंदोलन स्थगित करण्यात आले.* *यावेळी एडवोकेट सांगली जिल्हा वकील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुषार लोंढे साहेब आटपाडी तालुका सरचिटणीस मा.धनंजय वाघमारे आटपाडी तालुका उपाध्यक्ष मा.भारत वाघमारे,रिपाई प्रवक्ते रणजीत ऐवळे, गुलचंद भोरे, रघुनाथ कांबळे, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष मा.शरद वाघमारे विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष मा.विवेक सावंत, दिपक वाघमारे, स्वप्निल बाबर* *तडवळे शाखा अध्यक्ष समाधान मोटे, राहुल ऐवळे, योगेश ऐवळे, रेवन मोटे, बोंबेवाडीचे साहिल खरात, निखिल खरात, नेलकरंजी शाखेचे दिलीप घाडगे, दगडू मुलाणी, पिंपरीचे जगन्नाथ हाडमोडे, बनपुरी गावचे दादासाहेब वाघमारे सुनील वाघमारे अनिल वाघमारे नितीन वाघमारे, जहांगीर आतार, ज्ञानेश्वर देशमुख, संतोष बनसोडे,आटपाडी तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*