Now Loading

सभासदांना दिवाळी निमित्त तेल डबा वाटप

निरगुडसर तालुका आंबेगाव येथील श्री स्वामी समर्थ महिला घटस दिवाळीनिमित्त व्याजाच्या पैशातून सर्व सभासद तेलाचे डबे वाटण्यात आले आहे. माविम (महाराष्ट्र शासन आगिकृत) अंतर्गत जिज्ञासा सी. एम, आर. सी मंचर अंतर्गत निरगुडसर गावातील श्री स्वामी समर्थ महिला गट गेली 8 वर्ष सी. एम. आर. सी सोबत जोडलेला आहे. हा गटातील महिला सभासदांनी हा गट न फोडता खूप छान पद्धतीने चालू ठेवला आहे. या गटातील महिलांना पाचवे कर्ज 9 लाख रुपये कर्ज ऑक्टोंबर 2021 मध्ये मिळाले आहे. या गटा सोबत स्वामींनी या दोन्ही गटांनी गटाच्या व्याजाच्या पैशातून सर्व सभासदांना दिवाळी निमित्त तेल डबा वाटप करण्यात आले आहे. या वेळी निरगुडसर गावचे सरपंच सौ उर्मिलाताई वळसे पाटिल, उपसरपंच सपनाताई हांडे देशमुख व ग्रामपंचायत सदस्य आनंदराव वळसे पाटिल, जिज्ञासा सी. एम. आर. सी. मंचर व्यवस्थापक मनिषा जारकड उपस्थित होते.