Now Loading

वरसुबाई यात्रा उत्सव!

वरसुबाई यात्रा उत्सव! आदिवासी समाजाचा पारंपरिक ठेवा!! ------- आज जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील सुकाळवेढे येथे वरसुबाई यात्रेस भेट देऊन देवदर्शन केले. यावेळी माझ्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख व जुन्नरचे मा.आमदार शरददादा सोनवणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, दत्ता गवारी व प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांसह यात्रेचा व पारंपरिक उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. युवक मंडळींनी ढोल ताशा वाजवून व तरुणींनी लेझीम तसेच पारंपरिक नृत्य करत वातावरण मनमोहक केले. येथील वरसुबाई मंदिर बांधणीचे काम सुरू असल्याचे लक्षात येताच या सत्कार्यासाठी देवस्थान ट्रस्ट ला आर्थिक स्वरूपात मदत केली. या धार्मिक उत्सवात स्वतःला झोकून देत आदिवासी बंधू भगिनींचा असलेला सहभाग व चेहऱ्यावरील भाव पाहून मन अतिशय तजेलदार झाले. सर्वसामान्यांमधील अशी ऊर्जा आपल्या अंगात यांच्यासाठी अडी अडचणीला धावून जाण्याचं बळ देते.