Now Loading

बेनके कुटुंबियांच्या वतीने दिवाळी भेटवस्तू वाटप

कोरोना संकट काळात आरोग्य विभागाने ज्या हिमतीने काम केले त्याच हिमतीने कोरोना रोखण्यासाठी दारोदारी फिरुन ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स या माझ्या महिला भगिनींसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही माझ्यावतीने व आमच्या बेनके कुटुंबियांच्या वतीने दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आले. तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन हि दिवाळी भेट माझी पत्नी गौरी बेनके आणि त्यांच्या टिमने पोहोच केली. आळे-पिंपळवंडी, बेल्हे-राजुरी, नारायणगाव-वारुळवाडी, सावरगाव-धालेवाडी सह सर्वच जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स भगिनींना माझी पत्नी व अंजनी उन्नती फाऊंडेशनच्या प्रमुख गौरी बेनके व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या दिवाळी भेटवस्तूंचे वाटप तालुक्यातील विविध गावांमध्ये करण्यात आले. या प्रसंगी जि.प. सदस्य पांडुरंग पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास दरेकर, अरुणशेठ पारखे, अनघाताई घोडके, युवती तालुका अध्यक्ष अक्षदा मांडे, युवकचे कार्याध्यक्ष अतुल भांबेरे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.