Now Loading

अफगाणिस्तान: काबूलमधील आर्मी हॉस्पिटलजवळ बॉम्बस्फोट, 19 ठार, 50 जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शहरातील पोलीस जिल्हा-10 जवळील मिलिटरी हॉस्पिटलजवळ आज दोन बॉम्बस्फोट झाले. ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पहिला स्फोट सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर झाला, तर दुसरा स्फोटही याच रुग्णालयाजवळच्या परिसरात झाला. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने ही माहिती दिली आहे. या बॉम्बस्फोटांनंतर बराच वेळ गोळीबारही करण्यात आला. तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकला.
 

अधिक माहितीसाठी -  One India