Now Loading

नगर परिषद राज्य कर्मचारी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदीप रावणकर यांची निवड*

*नगर परिषद राज्य कर्मचारी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदीप रावणकर यांची निवड* प्रतिनिधी महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकार यांची राज्य कार्यकारी वर प्रदेश उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रदीप रावणकर हे अकोट नगर परिषद मध्ये कार्यरत असून कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा करणे व अकोला जिल्ह्यात कर्मचारी संघटनेत सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याकरता प्रदीप रावणकर नेहमी अग्रेसर असतात. या बाबींमुळे प्रदीप रावणकर यांना राज्य कार्यकारिणीवर घेण्यात आले आहे. शेगाव येथील नगरपरिषद टाऊन हॉल येथे झालेल्या राज्य संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये श्री प्रदीप रावणकर यांचे प्रदेश उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रदीप रावणकर यांचे निवडीने अकोला जिल्ह्यातील कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीचे अकोट नगर परिषदेचे अध्यक्ष हरिनारायण माकोडे, स्थायी समिती सदस्य विवेक बोचे तसेच सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, विविध विभागाचे विभाग प्रमुख, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच राज्य संघटनेचे सचिव गजानन इंगळे, जिल्हा सचिव दीपक सुरवाडे, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी तसेच स्थानिक संघटना अध्यक्ष ईश्वरदास पवार अकोट, नागोराव सुरजुसे बाळापुर, शिरीष गांधी मुर्तीजापुर, भरत मलीये तेल्हारा, नबी खान पातुर, रुपेश पिंजरकर बार्शिटाकळी तसेच जिल्ह्यातील सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी निवडीचे स्वागत केले आहे.