Now Loading

Patna 2013 Rally Blast Case: NIA कोर्टाने चार दोषींना फाशी व दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली

पाटणा येथील गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळलेल्या नऊ आरोपींना एनआयए न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. न्यायालयाने चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर दोन आरोपींना जन्मठेपेची तर दोघांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एका आरोपीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर 2013 रोजी गांधी मैदान आणि पाटणा जंक्शन येथे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेत सहा जण ठार तर 89 जखमी झाले होते. बुधवारी न्यायालयाने मुख्य सहा आरोपींना देशद्रोह, गुन्हेगारी कट, खून, हत्येचा प्रयत्न आणि UAPA कायद्याच्या कलमांखाली दोषी ठरवले होते.
 

अधिक माहितीसाठी -  Times Now News | India TV | India.com