Now Loading

Diwali 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमधील सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये सीमेचे रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी दिवाळीच्या खास मुहूर्तावर जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील नौशहरा येथे येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी लष्कराकडून मोठी मोहीम राबवली जात आहे. दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी तीन वर्षांत दुसऱ्यांदा राजौरी येथे येत आहेत.