Now Loading

कडलास येथून जर्सी गाईची चोरी

कडलास येथून सुमारे 18 हजार रुपयांची जर्सी गाय अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बापू हिंदुराव जाधव (राहणार कडलास) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दुग्ध व्यवसायासाठी एक गाय दोन महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. ती गाय तीन महिन्यांची गाभण होती. रात्री गाय घराच्या बाजूला बांधून ते जेवण करून झोपले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दगाय चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादीने आठवडा बाजारात जाऊनही शोध घेतला. परंतु, गाय सापडली नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.