Now Loading

आदिवासी बांधवांना कपडे व फराळ वाटप करून दिवाळी साजरी

बुलढाणा :खामगाव येथील स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावषीही देखील सलाईबन येथील अदिवासी बांधवांना कपडे व फराळ वाटप करून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर सर हे मानवाता जपत परिवारासह सातपुड्यातील अदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षी देखील तयांनी या उपक्रमात सातत्य राखत काल दि. 2 नोव्हेंबर रोजी सलाईबन येथे परिवारासह जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना कपडे फराळ वाटप केले. यावेळी आदीवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिसून आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर, सचिव प्रा. सुरेखा गुंजकर, तरुणाईचे मंजितसिंग शीख, उमाकांत कांडेकर, आदित्य गुंजकर, सानिका गुंजकर, दामू मिसाळ आदींची उपस्थिती होती