Now Loading

आँटो चालकास मारहाण चौघांविरूध्द गुन्हा

बुलढाणा: आँटोचे भाडे जास्त मागितल्याच्या कारणावरून तिघांनी आँटोचालकास लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना खामगाव येथील बाळापूर फैल भागात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शेख सिकंदर शेख उस्मान वय ४५ रा. महेबुब नगर याने शहरनगर पोस्टेला तक्रार दिली की, काल २ नोव्हेंबर रोजी आँटो मधून शुभम हट्टेल, विकी हट्टेल आणि आणखी दोन अनोळखी इसमांनी प्रवास करून त्यांना बाळपूरफैल जवळील जे.जे. टायर जवळ सोडून दिले. यावेळी आँटोचे भाडे मागितल्यावरून त्यांनी जास्त भाडे घेतो का असे म्हणून वाद घतला व शिवीगाळ करून चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विक्की हट्टेल याने काठीने मारहाण करून जखमी केले. यातक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरूध्द कलम ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.