Now Loading

वाढदिवसानिमित्त ब्लँकेटचे वाटप

बुलढाणा : खामगाव येथील गजानन ट्रेडिंगचे संचालक आकाश सातपुतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती फाऊंडेशनच्यावतीने ,मंगळवारी रात्री कडाक्याच्या थंडीत शहरातील उघड्या जागेवर झोपणाऱ्या गोरगरीब, बेघर आणि गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब देण्यात आली. आकाश सातपुतळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. रस्त्याच्या कडेला उघड्यावर जीवन व्यतीत करतात. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या बसस्थानक, रेल्वे स्टेशन, नांदुरा रोड आदि भागातील गोरगरीब व गरजुंना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लैंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार शिवाजी भोसले, कुणाल देशपांडे उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.