Now Loading

शहरातून आणखी एका इसमाचा मोबाईल लंपास

बुलढाणा : खामगाव शहरात आणखी एका इसमाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. येथील गांधीचौकात ही घटना २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. दिलीप तेजमल थानवी वय ५०रा, कालीका माता मंदिर जवळ. हे गांधी चौकात कामानिमित्त गेले असता त्यांचा अँड्रोईड कंपनीचा ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने हात चालाखिने खिशातून लंपास केला. सदर प्रकार दिलीप थानवी यांना उशिरा लक्षात आली. यावेळी त्यांनी मोबाईल चोरी बाबत शहर पोस्टेला तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत. शहरात मागील दोन ते तीन दिवसात अनेकांचे मोबाईल लंपास झाले आहे. पोलिसांकडून मात्र अद्यापपर्यंत चोरट्यांचा छडा लावण्यात आलेला नाही.