Now Loading

महिनाभरात दोन प्रेमी युगुलांनी मृत्यूला कवटाळले

बुलढाणा : घसरून पळून जावून संसार थाटू पाहणाऱ्यांचा शेवट हा वाईटच होत असल्याचा घटना समाजात घटतांना दिसतात. यामध्ये अनेकवेळा एकमेकांपासून अचानक अलिप्त होणे अथवा एकमेंकावर संशय घेत संबधात दुरावा निर्माण होण हे प्रकार तर घडतातच या उपरही शेवटी साथ मरेंगे प्रमाणे ते आत्महत्येचा मार्ग ही पत्कारतात गेल्या महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि खामगाव तालुक्यामध्ये तब्बल दोन प्रेमी युगुलांनी मृत्यूला कवटाळल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. देवधाबा येथील सौ. शितल प्रविण सपकाळ वय २४ या विवाहीतेला ६ व ४ वर्षाचे दोन अपत्य होते. असे असतांना तीचे गावातीलच राजधर संभाजी निळे वय२२ या अविवाहीत तरुणासोबत प्रेमसंबध जुळले. हे संबंध वाढतच गेल्याने २१ सप्टेंबर रोजी सदर विवाहीता व राजघर या दोघांनी गावातून पलायन केले. याबाबत दोघांच्याही नातेवाईकांनी पोलिसात बेपत्ताच्या तक्रारी दिल्या होत्या. त्यांचा शोध घेवूनही ते मिळाले नव्हते परंतू २१ ऑक्टोबर रोजी या दोघांनीही मुंबई मांडूप येथे भाड्याच्या खोलीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घरातून पळून गेल्यानंतर मुंबई भांडूप येथे त्यांनी स्थायिक होऊन संसार थाटण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्या या प्रयत्नाला नियतीने साथ दिली नाही. दुसरीकडे खामगाव तालक्यातील कंबेफळ झोपडपट्टी येथील अविवाहीत तरुण प्रेमी युगुलाने १० ऑक्टोबर च्या रात्री घरुन पलायन केले. ११ ऑक्टोबर रोजी या दोघांच्याही नातेवाईकांनी पि. राजा पोस्टेला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दिल्या परंतू १३ ऑक्टोबर रोजी पि. राजा निपाणा रस्त्यावरील विहीरीत या दोघांचेही प्रेत आढळून आले. मृतक हा प्रमोद भांबळकार वय २८ तर विद्या सावरकर क्य २० असे या दोघांचे निष्पन्न झाले. लग्न करुन संसार थाटण्याचे स्वप्न पाहत या प्रेमी युगुलाने घस्न पलायन तर केले शेवटी मात्र मृत्यूला कवटाळले एकंदरीत घरुन पळून जावून संसार थाटू पाहणाऱ्यांचा शेवट हा वाईट होत असल्याचे या दोन घटनांवरुन स्पष्ट झाले आहेत.