Now Loading

वरसूबाई माता देवीची यात्रा

जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील सुकाळवेढे गावचं ग्रामदैवत आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक ठिकाणांपैकी एक अर्थात वरसूबाई माता देवीची यात्रा आज अनेक भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मीही आवर्जून याठिकाणी दिवाळी उत्सव आणि यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलो. वरसूबाई मातेचा आशिर्वाद घेऊन निवडणुकीच्या तयारीला मी लागलो होतो. त्याप्रसंगाची आठवण येत असताना सुकाळवेढे येथे मुक्कामही केला होता तीही आठवण माझ्या मनात आज वरसूबाई मातेचे दर्शन घेताना आली. आज यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांशी संवाद साधला तसेच माझा व माझ्या समवेत आलेल्या सहकाऱ्यांचा आदर सत्कार गावकऱ्यांनी केला त्याबद्दल आभार मानले. अजून एक आठवण या निमित्ताने आपणा सर्वांना सांगविशी वाटतेय ती म्हणजे ना.वल्लभशेठ बेनके साहेब आमदार असताना सुकाळवेढे गावात प्रथमच एसटी बस धावली होती. या दुर्गम भागात दळणवळण सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी ना.बेनके साहेबांनी पुढाकार घेऊन एसटी बस सुरू केली होती. आज यागावाला जाण्या-येण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता येत्या काळात निश्चितपणे आणखी दर्जेदार करण्यात येईल असे ग्रामस्थांना आश्वस्त केले. या प्रसंगी माझ्या समवेत भाऊसाहेब देवाडे, अमोल लांडे, मारुतीशेठ वायाळ यांसह विविध मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.