Now Loading

ग्रामस्थांशी आमदार बेनके यांनी साधला संवाद

ओतूर येथे पानसरेवाडी आणि डुंबरे मळा शिवारात ग्रामस्थांशी आमदार अतूल बेनके यांनी संवाद साधला. सहकारी भास्करशेठ डुंबरे यांच्या विनंतीनुसार त्यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला व चहापान केले. या भेटीप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ मंडळींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ओतूर ग्रामपंचायत माध्यमातून सुरू असलेल्या व ओतूर परिसरातील नियोजित कामांचा आढावा देखील या प्रसंगी घेतला व उपस्थित मान्यवरांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी समवेत जि.प.सदस्य मोहितशेठ ढमाले, सभापती विशालभाऊ तांबे, जालिंदर पानसरे, अनिलशेठ तांबे, सरपंच गितांजली पानसरे, प्रशांत डुंबरे, शेखर डुंबरे, देवेंद्र पानसरे, अतुल गोरे, पंकज आरोटे, प्रकाशनाना डुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.