Now Loading

आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

आंबेगाव तालुक्यातील नागापूर ता. आंबेगाव येथील आरटीआय कार्यकर्ता याच्यावर खंडणी/धमकी या प्रकारच्या गंभीर गुन्हे दाखल झाले असतानाच दि. 0२/११/२१ रोजी मुरूम चोरीप्रकरणी खोटी तक्रार करून शेतकऱ्याकडे 40 हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शेतकरी विकास सुखदेव वाघ रा. रांजनी ता. आंबेगाव जिल्हा पुणे यांनी दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी वाघ यांची नागापूर येथे शेत जमीन असून ते 2019 मध्ये जमिनीचे सपाटीकरण करत असताना उमेश इचके रा. नागापूर ता. आंबेगाव जिल्हा पुणे यांनी तेथे येऊन वाघ यांना तुम्ही याठिकाणी सपाटीकरण कसे काय करता येथील मुरूम कोठे गेला हे तत्काळ थांबवा नाहीतर तुमची तहसीलदारांकडे तक्रार करेल अशी धमकी दिली. त्यानंतर वाघ हे असे करू नका असे म्हटल्यानंतर इचके याने 40 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर वाघ यांनी पैसे न दिल्याने यांनी गावचे तलाठी मॅडम यांना याबाबत माहिती दिली. तलाठी यांनी पंचनामा करून प्रकरण मा तहसीलदार यांच्या समक्ष चालू झाले. त्यानंतर उमेश इचके याने फिर्यादी वाघ यांना भेटून मी तक्रार मागे घेतो मला 40 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणाला. याबाबत फिर्यादी वाघ यांनी दिनांक 0३/0१/२०२० रोजी इचके विरोधात मंचर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दाखल केला होता. त्यानंतर इचके यांनी फिर्यादी कडे वारंवार पैशाची मागणी करत वेगवेगळ्या कार्यालयात खोट्या तक्रारी करून त्रास देत असून तसेच मी आरटीआय कार्यकर्ता आहे. तुला कामाला लावतो अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. या बाबत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स.ई रावसाहेब बांबळे करत आहे.