Now Loading

शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या इलेक्ट्रिक केबलची चोरी

निरगुडसर गावच्या हद्दीत असलेल्या घोड नदीपात्रा शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून सुमारे चार शेतकऱ्यांच्या मिळून 40 हजार रुपये किमतीच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि.1/11/21 रोजी घडली आहे. याबाबत दत्तात्रय रामचंद्र टाव्हरे ( रा. निरगुडसर हांडेवस्ती ता.आंबेगाव ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की निरगुडसर गावच्या हद्दीत असलेल्या जुन्या पुलाच्या जवळ घोड नदीच्या पात्रात असलेली मोटार शेतकरी दत्तात्रय टाव्हरे हे दि.1 रोजी चालू करण्यासाठी गेलेले असताना त्यांना त्यांच्या मोटारीची केबल इलेक्ट्रिक वायर दिसली नाही त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ती सापडली नाही तसेच त्यांच्या शेजारील मोटार असलेले शेतकरी रमाकांत पंढरीनाथ थोरात, मथुराम मारुती थोरात, रामदास भाऊ गोपाळे ( सर्व रा निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ) यांच्या देखील मोटारी पासून ते स्टार्टर बॉक्स पर्यंतचे इलेक्ट्रिक केबल चोरीला गेले असल्याचे लक्षात आले आहे. या चारही शेतकऱ्यांच्या मिळून सुमारे चाळीस हजार रुपयाची केबल चोरीला गेले असून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक खैरे करत आहेत.