Now Loading

अवैध दारू विक्रीवर मंचर पोलिसांची कारवाई

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अवसरी बुद्रुक माळी मळा येथील स्मशानभूमी येथे व भराडी फाटा येथील हॉटेल किणारा पत्रा शेडच्या बाजूला अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्यांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, निरगुडसर फाटा तालुका आंबेगाव येथे हॉटेल किनारा च्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना कळली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी तुषार शांताराम पोखरकर ( रा.बेलसरवाडी, ता.आंबेगाव, पुणे ) हा दारु विक्री करताना आढळून आला आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी 2,700/- रु दारू जप्त केली आहे. तसेच अवसरी बुद्रुक माळीमळा तालुका आंबेगाव येथे स्मशानभूमीजवळ पत्र्याच्या शेड च्या बाजूला विष्णु गोविंद हिंगे रा.अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव जि. पुणे हे दारु विक्री करताना आढळून आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळील 1,440/- दारुचा साठा जप्त केला असून वरील दोघांवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस जवान योगेश रोडे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार डावखर करत आहे.