Now Loading

मंत्री छगन भुजबळ यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा*

मुंबई, नाशिक दि. ३ नोव्हेंबर-:* दिवाळी हा सण दिव्यांचा आहे, आनंदाचा आहे त्यामुळे ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभसंदेशात मंत्री छगन भुजबळ म्हणतात की, कोरोनाचे संकट अजून टळलेल नाही त्यामुळे दिवाळी ही कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करत साजरी करूया त्याचप्रमाणे सामाजिक भान जपत आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना देखील दिवाळीच्या आनंदात सहभागी करुन घेण्याचे आवाहन देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण आहे तरी देखील या दिवाळीत स्वतःसह इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करूया प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी कमीतकमी फटाक्यांचा वापर करण्याचे आवाहन देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. दिवाळीनिमित्त आपण आपल्या घरात लावत असलेल्या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-प्रथा-परंपरांचा अंधारही आपल्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करुया अश्या भावना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.