Now Loading

राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात भाजप आमदार श्वेता महाले सह शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी , बेसन भाकर खाऊन आणि काळे कंदील लावून केला सरकारचा निषेध ..

बुलढाणा : विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात संततधार आणि ढगफुटीच्या पावसाने प्रचंड नुकसान झालेय .. शेतकऱ्यांच्या तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.. अस्मानी संकटाने तर लुटलेच पण सुलतानाने पण झोडपले अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे... मात्र संपूर्ण चिखली विधानसभा मतदार संघात 80 % शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतांना ही शासनाने केवळ साडेचार हजार शेतकरीच नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविलेय .. उर्वरित शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेला असून त्यांना मअद्यापही मदत मिळाली नाहीय .. त्यामुळे या आघाडी सरकारच्या निषेध आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी चिखली विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ठिक ठिकाणी काळी दिवाळी साजरी केलीय .. एव्हढेडच नव्हे तर शेतकऱ्यांसोबत बेसन - भाकर खाऊन सरकारचा निषेध केलाय .. सोबतच काळे कंदील आणि झंडे लावून हि काळी दिवाळी साजरी केलीय .. .