Now Loading

सार्वजनिक विहीरीत जात आहे नालीचे पाणी, रोग पसरण्याची शक्यता.

लोहारी सावंगा गावातील बाजार चौकात दोन सार्वजनिक विहिरी आहे. लहान आणि मोठी अश्या दोन विहिरी आहे. मोठ्याविहिरी वरून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. तसेच लहान विहीर सुद्धा गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापरतात. मात्र जवळूनच जात असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीतील पाणी विहिरीतील पाणीसाठ्यात जात आहे. सांडपाणी वाहून नेणारी नाली फुटल्याने तेच पाणी विहिरीतील पाणी साठ्यात मिळत आहे. त्यामुळं लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत ला अनेकदा या विषयी तक्रार करण्यात आली. मात्र याकड कोणीही लक्ष देत नाही आहे. ग्रामपंचायत ने या समस्येवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.