Now Loading

समाजक्रांती परिवाच्या वतीने गरजवंताला मदत देऊन केली दिवाळी साजरी

दिवाळी निमित्ताने समाजक्रांती परिवार मेहकरच्या वतीने लोणार सुलतानपुर येथील ४ गरजवंत कुटुंबांना प्रत्येकी ५०००/- या प्रमाणे २०,०००/-रुपयाचे आर्थिक योगदान देण्यात आले.त्यामध्ये २०००/- रोख ३०००/- रु मध्ये किराणा,कपडे व मिठाई देण्यात आले. मागील अतिवृष्टीमुळे सदर कुटुंबांच्या भेटीचा योग आला.अगदी बिकट परिस्थितीत सदर कुटुंब आयुष्याचा सामना करताहेत हे लक्षात होत.त्यात ४ गोरगरीब कुटुंबाना दिवाळी निमित्त सद्धभावना भेट म्हणून काहीशी मदत करण्याचा संकल्प समाजक्रांती परिवाराचा असतो त्याअनुषंगाने आज ४ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीमती लताबाई बबन कुडके वयोवृद्ध निराधार महीला, श्रीमती धृपदाबाई नारायण अवचार वयोवृद्ध महिला, श्रीमती आशाबाई रामेश्वर सुरुषे आत्महत्याग्रस्त शेतममजुराच्या पत्नी. श्रीमती शहीदाबी शेख जब्बार निराधार महीला अश्या निराधारांना काहीसा आधार देऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न समाजक्रांती परिवाराच्या वतीने करण्यात आला यावेळी लोणार पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे, समाजक्रांती परिवाराचे जेष्ठ मार्गदर्शक तथा सेवाभावी व्यक्तिमत्त्व श्री मंगलशेठ जैन कोठारी,परिवाराचे सदस्य, सरपंच अरुण दळवी, गणेश राऊत, डॉ राम कडुकार, सरपंच श्रीमती चंद्रकलाबाई नत्थू अवचार , सिद्धू सुरुषे, भिकाजी भाणापुरे उपस्थित होते.