Now Loading

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाने आरेगांव येथील लाभार्थ्यांना गॅस वाटप

मेहकर तालुक्यातील आरेगांव येथे ग्रामपंचायत समोरच्या प्रांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाने छोटेखानी गॕस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष शेषराव रामकिसन टाले होते.प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी अमोल धोटे, देवेंद्र आखाडे,राजुभाऊ नेमाडे,सुशिल गवाई,ओम भालेराव,गणेश धाबे,विवेक ठाकरे,सलिम शहा,मुज्जुभाई,प्रकाश भालेराव, श्री संत गजानन महाराज एच.पी.गॕस एंजन्सीचे संचालक अंकुश जाधव ,व्यवस्थापक अलिम भाई हे होते. या कार्यक्रमामध्ये आरेगांव येथील नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ब-याच लाभार्थ्‍यांना अजून पर्यंत १०० रुपयांमध्ये गॅस वाटप झालेले नव्हते.अध्यापर्यंत काही कुंटुबाला या योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ही बाब स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या लक्षात आणून दिली व लगेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यासाठी श्री संत गजानन महाराज एचपी गॅस एजन्सी लेहनी च्या माध्यमातून तसेच आरेगांव येथील स्वाभिमानी एचपी गॅस पॉइंट यांच्या मदतीने गावातील पात्र लाभार्थींकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेमार्फत गॕस वाटपासाठी कागदपत्रे गोळा करून ऑनलाइन करण्यात आले. त्यानंतर सतत गेल्या चार महिन्यापासून यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी पाठपुरावा करून शेकडो गॅस मंजूर करून आणले त्यामुळे आरेगांव येथील महिलांसाठी "धूर मुक्त चुल मुक्त" अभियान राबविले असून यामुळे घरातील धुरामुळे होणारे आजार कमी होतील कुंटुबाला प्रदुषणमुक्त वातावरण मिळेल.तसेच इंधनाचा वापर सुद्धा कमी होऊन वृक्षतोड थांबेल व निसर्ग चक्र सुरळीत राहण्यास मदत होईल.तसेच पुढील काळात सुद्धा आरेगांव मधिल उर्वरित पाञ लोकांना लाभ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातत्याने आम्ही प्रयत्नशील राहू व शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोचविण्यासाठी स्वाभिमानी चा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता मदत करणार आहे या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कोणत्याही कुटुंबाला अजून पर्यंत लाभ मिळाला नसेल तर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते शी संपर्क साधावा आम्ही त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू सत्ता असो अगर नसो मात्र जनसामान्यांसाठी नेहमीच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कायम आघाडीवर रस्त्यावर असते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे व त्यांचे समाधान करणे यातच आम्हाला सत्तेचा आनंद मिळतो असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल धोटे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषराव टाले,प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले,तालुका अध्यक्ष अमोल धोटे ,देवेंद्र आखाडे,विवेक ठाकरे,राजुभाऊ नेमाडे,सुशिल गवाई,ओम भालेराव,गणेश धाबे,बालासाहेब टाले,गणपत टाले,विश्वनाथ मेटांगळे,विजय आंधळे,उत्तम देशमुख,अशोक देशमुख, व प्रमुख पदाधिकारी,यांच्या हस्ते गॕस इतर साहीत्य वितरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस मिळालेल्या लाभार्थींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते व त्यांनी या उपक्रमाचे कौतुक सुद्धा केले. यावेळी,तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी अमोल धोटे, यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक युवानेते देवेंद्र आखाडे यांनी केले व सूत्रसंचालन गौतम सदावर्ते सर यांनी केले या कार्यक्रमासाठी,गौतम सदावर्ते,रामेश्वर वायाळ,विजय आंधळे,गोपाल कुटे,विष्णु धांडे,निंबाजी सोनुने,सचिन मेटांगळे,गणेश टाले,सुनिल मानवतकर,सलिम शहा हुसेन शहा, यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने उज्वला प्रधानमंञी योजनेचे लाभार्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच गावातील शौकत भाई, विलास खोरणे, प्रकाश काटेकर, शंकर सोनुने, कैलास इंगोले, गजानन सोनोने, गजानन मेटांगळे, जब्बार खा पठाण, हबीब खा, श्रीकांत कांबळे निजाम भाई,सज्जन फुके.सह गावकरी उपस्थित होते.