Now Loading

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दिपावली संध्येत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याने "बालकामगारांना" राबवले

सोलापूर जिल्हा परिषदेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिपावली सणाच्या निमित्ताने दिपावली संध्या हा संगीतमय कार्यक्रम घेतला. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भजन तर सादर केलेच मात्र आपल्या रोमँटिक अंदाजात हिंदी गाणे गाऊन कार्यक्रमात रंगत आणली, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही सुंदर गीत गायले, आरटीओ अधिकाऱ्याने सुद्धा गाणे गायले, कोरोना काळात मरगळलेल्या शिक्षण विभागात या कार्यक्रमाने चैतन्य निर्माण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमधील कलागुण पाहून त्यांना वाव देण्यासाठी ही संकल्पना सुचवली, त्यांचा कायम प्रामाणिक प्रयत्न असतो.परंतू, त्यांच्या प्रयत्नांना अधिकारी कसे खो घालतात हे दिपावली संध्या कार्यक्रमात दिसून आले. कार्यक्रमाचे नियोजन कोल्हापूर हुन नुकतेच आलेले आणि झेडपीत कडक शिस्तीचा आव आणणाऱ्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे होते. त्यांनी आपल्या आवाजात दोन गाणी सादर केली, आकाशी झेप घे रे पाखरा म्हणणाऱ्या लोहार यांनी दोन पाखरं म्हणजेच बाल कामगार या कार्यक्रमात राबवली. लोहार यांच्यावर कार्यक्रमाची एवढी धुंदी चढली होती की, समोर बाल कामगार काम करत आहेत हे सुद्धा त्यांना माहीत नव्हते. ते दोन बाल कामगार राबत होते ते कुणालाही दिसले कसे नाहीत. हे त्या कार्यक्रमाचे दुर्दैव म्हणावे लागेल.