Now Loading

खाकीला बदनाम करणारे कृत्य, दारूच्या नशेत हंगामा करणारा पोलीस कर्मचारी व्यापाऱ्यांचे पाया हि पडत होता... व्हिडीओ व्हायरल

बुलढाणा : पोलीस कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचे तसंच गुंडगिरीची अनेक उदाहरण सातत्याने समोर येत असतात.अश्यातच बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फटका बाजारातला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. या बाजारात रात्री साडे नऊच्या सुमारास पोहचून दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत वाद घालतांना दिसून येत आहे.सदर कर्मचारी दारुच्या नशेत असल्याचं आरोप करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात घाटाखाली भागांसाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे मागील महिन्यात रुजू झाले दत्त हे अवैध व्यवसायिकांचे कर्दनकाळ आणि अवैध व्यवसायांना थारा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खडक कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत. यासोबतच त्यांनी पदभार स्वीकारताच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपल्या क्षेत्रामध्ये पोलिसांनी फक्त पोलिसिंग करावी इतर कामांमध्ये, अवैध व्यवसाय मध्ये अथवा अवैध व्यवसाय कर्नाऱ्यासोबत हितसंबंध जोपासत असल्याचे दिसून आल्यावर आपण कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे खामगाव शेगाव मलकापूर, तामगाव आणि जळगाव जामोद शहरणांतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील धंद्यांना काही प्रमाणात थांबा दिल्याचे दिसून येते. याशिवाय कुठल्याही कर्मचाऱ्यांनी अवैध व्यावसायिकांसोबत संबंध ठेवू नये याशिवाय जनतेशी बेशिस्त वागू नये अशा सूचना दिल्या होत्या असे असतांनाही श्रवण दत्त यांचे सध्या होमटाऊन मध्येच एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणा वायरल व्हिडिओ च्या माध्यमातून समोर आलेला आहे. हे होते खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पो.कॉ गणेश डुकरे नामक कर्मचारी यांनी कर्तव्यावर नसतानांअथवा पोलीस ड्रेस न लावता दारूच्या नशेत ते शहरातील फटका बाजारात पोहचले. आणि आपण पोलीस असून दुकाने बदन करायचे सांगितले. दरम्यान ९.३० वाजेपासून सुरु असलेले त्यांचे हे नाट्य रात्री १० वाजे पर्यंत चालले. दरम्यान एका व्यावसायिकांने त्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. आता या प्रकरणात कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.