Now Loading

उंबरी बाळापूर येथे पकडला विषारी घोणस साप !

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील नेमबाई माता देवस्थानच्या पायथ्याशी असलेल्या एका समाजाच्या वस्तीनजीक ऐन दिवाळीच्या दिवशी रात्री नऊ वाजता सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी विषारी घोणस साप पकडला. त्यामुळे बापरे.. बाप..! घोणस साप म्हणत रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.  उंबरी बाळापूर येथील नेमबाई माता देवस्थानच्या पायथ्याशी असलेल्या एका समाजाच्या वस्तीनजीक घोणस साप निघाल्याने रहिवाशांनी आश्वी येथील सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांना माहिती दिली. सर्पमित्र पवार यांनी तातडीने उंबरी बाळापूर येथील नेमबाई माता देवस्थान येथे धाव घेत विषारी घोणस सापाला पकडून एका प्लास्टिक बरणीत बंद केले. सदर विषारी घोणस साप हा आजगराप्रमाणे दिसतो. हा साप हिवाळा या ऋतूमध्ये जास्त आढळून येतो. घोणस साप पिल्ले देतो. याची पिल्ले देण्याची क्षमता ४० पासून ते १०४ पर्यंत आहे. भारतातील सर्वाधिक जास्त पिल्लू देणारा हा साप आहे. या सापांमध्ये हिमो टॉक्सिक नावाचे विष आहे. या सापाने चावा घेतलेल्या जागेवर सूज येते, नाकातून, डोळ्यातून, तोंडा वाटे  व लघवी वाटे रक्त सराव सुरू होतो आणि किडन्या निकामी होवून व्यक्तीचा मृत्यू होतो. जरी व्यक्ती बचावला तर ज्या जागेवर त्याने चावा घेतला आहे, ती जागा सडते. भारतातील सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांचे याच सर्पदंशाने मृत्यू होतात, अशी माहिती  पशुवैद्य तज्ञ डॉ. अमय गुणे व डॉ. अनिल क्षिरसागर यांनी दिल्याचे सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी सांगितले. उंबरी बाळापूर येथील नेमबाई माता देवस्थानच्या पायथ्याशी पकडलेल्या विषारी घोणस सापाला आपण निसर्गात मुक्त केल्याची माहिती सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी दिली.