Now Loading

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विविध विकास कामांची उद्घाटने

संगमनेर : संगमनेर नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर शहरात रस्ता चौपदरीकरणासह विविध विकास कामांची उद्घाटने करण्यात आली. प्रसंगी आ. डाॅ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे सहित मान्यवर उपस्थित होते. संगमनेर शहरातील तीनबत्ती चौक ते पंचायत समिती रस्ता कामाचे चौपदरीकरण, साई बाबा मंदिर ते काशी आई माता मंदिर रस्ता डांबरीकरण व पेव्हिंग ब्लाॅक बसविणे, नगररोड डांबरीकरण व डिव्हायडर तसेच म्हाळुंगी नदीवरील पुलाचे सुशोभिकरण, अकोले नाका परिसरात म्हाळुंगी नदीला संरक्षण भिंत बांधणे, देवाचा मळा येथील रस्ता डांबरीकरण करणे तसेच शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अशा विविध विकास कामांची उद्घाटने करण्यात आली.