Now Loading

*  दलित महासंघ  * *संस्थापक अध्यक्ष, प्रा.डॉ मछिंद्र सकटे साहेब* *फटाक्यांची माळ* *विजेची रोषणाई* *पणत्यांची आरास* *उटण्याची आंघोळ*  *रांगोळीची रंगत* *फराळाची संगत* *लक्ष्मीची आराधना* *भाऊबीजेची ओढ* *दिपावलीचा सण आहे खूपच गोड...* *मंगलमय दिवाळी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद व चैतन्य घेवून येत असतो. परंतु ज्यांचे कोणी नाही, जे निराधार आहेत त्यांच्या आयुष्यात सदैव निराशा व अंधकार आहे. तो अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करणे हीच दलित महासंघाची ओळख आहे.* *जे का रंजले गांजले..* *त्यांसी म्हणे जो आपुले..* *तोचि साधु ओळखावा..* *देव तेथेची जाणावा..* *संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे साहेब* यांच्या नेतृत्वात दलित महासंघाने आजपर्यंत अनेक लोकांचे विविध प्रश्न सोडविले आहेत, अनेक उल्लेखनीय आंदोलने करून वंचित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून संघटनेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.      दिवाळी निमित्त माणुसकी, कर्तव्य व मदतीचा हात म्हणून दलित महासंघ शाखा कासेगांव अध्यक्ष मा. बाळकृष्ण पाटसुते यांच्यातर्फे कासेगांव परिसरातील निराधार व वयोवृद्ध महिलांना साडी व दिवाळी किट भेट देण्यात आली.    याप्रसंगी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. उत्तम चांदणे (आप्पा),दलित महासंघ मार्गदकर्श  दादासो सातपुते.मा. विकास बल्लाळ (सांगली जिल्हा अध्यक्ष, दलित महासंघ), मा.बापूराव बडेकर (वाळवा तालुका कार्याध्यक्ष), मा. रवी बल्लाळ (संघटक वाळवा तालुका),  .... हे उपस्थित होते.     दलित महासंघ कासेगांव शाखेचे अध्यक्ष *बाळकृष्ण पाटसुते* यांनी साजरा केलेला हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय असून खऱ्या अर्थाने दुसऱ्यांचा, निराधारांच्या आयुष्यात सुखाचा तेजोमय प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून हीच खरी दिवाळी आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सर्व निराधार महिलांनी यावेळी *बाळकृष्ण पाटसुते* यांचे आभार मानले. यावेळी.दलित महासंघ शाखा कासेगांव उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे.दलित महासंघ कार्याध्यक्ष अर्जुन बडेकर.अशोक पाटसुते.गणेश मिसाळ.निखील पाटील.चांदसाहेब चांदणे.शहाजी परीट.