Now Loading

आदीवासी महामेळावा उद्या शेगावात: माजी मंत्री राहणार उपस्थित

राज्यातील 1 कोटी आदिवासींचे घटनने दिलेले अनु. जमातीचे आरक्षण महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक आपल्या यंत्रणांचा वापर करून मिळू देत नाही. मिळालेले फायदे काढून घेण्याचा सतत प्रयत्न करते. त्या विरोधात संघर्षाची सामाजिक यासाठी राजकीय न्यायालयीन पेटलेली मशाल तीव्र करण्याकरिता महादेव कोळी. मल्हार काळी, हलबा, माना, टोकरे कोळी, ठाकर, ठाकूर मन्नेवार, मन्नेवारलू गोवारी, हलबी इ. प्रमुख जमातीसह 45 पैकी 35 अनु जमातीच्या आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा महामेळावा उद्या ७ नोभंमेबर रोजी संत नागरी शेगावात पार पडणार असून या महामेळाव्याला माजी मंत्री दशरथ भांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत कृष्णा कॉटेज, येथे आयोजित या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.