Now Loading

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टिच्या सिंदेवाही शहर अध्यक्ष पदी बांबोळे

सिंदेवाही (7 नोव्हे)- सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने नुकताच सिंदेवाही राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री. प्रफुल महाजन यांच्या हस्ते सिंदेवाही शहर अध्यक्ष पदी अनंत बांबोळे यांची नियुक्ति केली आहे व बांबोळे यांना शहर अध्यक्ष पदाचे नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रफुल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष इब्राहीम शेख, राजकुमार अलोने महासचिव शहर, नरेश टोंगे, वसंत कुळमेथे तसेच राकांपा तथा रायुकां चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बांबोळे यांना सिंदेवाही शहर अध्यक्ष पदाचे नियुक्तिपत्र 05 नोव्हे रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रफुल महाजन यांच्याकडुन प्राप्त झाला आहे.