Now Loading

पिंप्री लौकी येथे एकाची गळफास घेत आत्महत्या

संगमनेर : तालुक्यातील पिंप्री लौकी येथे एकाने शेती व पाण्याच्या वादारून शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. भाऊसाहेब किसन गीते असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याप्रकरणी संदिप भाऊसाहेब गीते यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सोमनाथ गीते, मनीषा गीते, तानाजी गीते, गौरव गीते, स्वाती गीते ( सर्व. राहणार पिंप्री लौकी ता. संगमनेर ) यांच्या विरुद्ध आश्वि पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वि पोलीस अधिक तपास करीत आहेत.