Now Loading

पारवा पोलिसांची अवैध दारू वर मोठी कारवाई

अकोला बाजार येथील दारू भट्टीवरून अवैध विक्रीसाठी दारूची खेप घेऊन जात असलेल्या चौघांना पारवा पोलिसांनी मुद्देमाल व वाहनासह अटक केली. ही कारवाई रविवारी 7नोव्हेंबर ला पहाटे २.३० वाजता घाटंजी तालुक्यातील घोटी येथे पारवा पोलिसांनी केली आहे. सावळी सदोबा येथे अवैध दारूविक्री करणाऱ्यांना सापळा रचून पारवा पोलिसांनी घोटी येथे मुद्देमालासह अटक केली. शुभम रमेश जयस्वाल,विशाल विठ्ठल शेंडे, कुणाला विजय तांदूळकर सर्व रा. मोहाफाटा चांदोरेनगर यवतमाळ, गिरिधर ऊर्फ बादल दिनेश जयस्वाल रा.उमरी कापेश्वर ता.आर्णी, इमरान रा.अकोला बाजार यांचेवर ही कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालका विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.९५ हजार ५००ची दारू,दुचाकी, कार असा ६ लाख ९५हजारांचा मुद्देमाल जप्त केला.अवैध दारूविक्री वर पारवा पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.ही कारवाई ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात जमादार गणेश राठोड, संदीप महाजन, संजय पांडे, यांनी ग्रामस्थ अरविंद राठोड, महादेव राठोड यांचे सहकार्याने केली.