Now Loading

दत्तरामपूर फाट्यावर पुन्हा अपघात,1गंभीर

आर्णी ते यवतमाळ फोरवे वरील दत्तरामपूर फाट्यावर दुचाकी MH27 CL 4187 चा अपघात घडल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना 7नोव्हेंबर ला संध्याकाळी 7वाजता घडली आहे. जखमीला तातडीने ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ ला हलविले आहे. जखमी व्यक्ती अमरावती येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. आर्णी ते यवतमाळ चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर दत्तरामपूर गावाजवळ अपघातांची शृंखला सुरू आहे. येथे चौपदरी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने व मार्ग खडतर असल्याने अपघात घडत आहे.