Now Loading

लालपरी थांबली,आंदोलनाचे पडसाद आर्णीत

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता ग्रामीण भागात ही उमटू लागले आहे. दिग्रस व दारव्हा आगारातील एसटी बस ची चाके थांबल्यामुळे,ग्रामीण भागात धावणारी लालपरी शुक्रवार, शनिवार पासून दिसून येत नाही आहे. त्यामुळे आर्णी बस स्थानकावर पूर्णपणे शुकशुकाट पसरला असून अनेक प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. 7नोव्हेंबर ला आर्णी राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघ व इतर ऑफ सूट विंग चे कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्याच संघटना या आंदोलनात सहभागी झाल्याचे आर्णी बस स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी संवितले.