Now Loading

ना.नितीन गडकरी सोडविणार आर्णी च्या समस्या

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना आर्णी तालुक्यातील समस्यांबाबत माहिती मिळताच त्यांनी आर्णी बाबत सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व समस्या निकाली काढण्यासाठी आदेश दिल्याची माहिती पुढे आली आहे. दिवाळी निमित्त भेटी दरम्यान आर्णी चे मनवर बंधू कुणाल व विशाल यांनी आर्णी तालुका व शहर समस्या बाबत नामदार गडकरींना अवगत करून दिले. आर्णी तालुक्यातून गेलेला चौपदरी राष्ट्रीय महामार्ग 361 हा आर्णी जवळील दत्तरामपूर व ईतर ठिकाणी अर्धवट बांधकाम असल्या कारणाने अपघातांची शृंखला तयार झाली आहे. तसेच आर्णी शहरातील मुख्य मार्गाचे सौंदर्यीकरण,तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचा असल्याचा ऑक्सिजन प्लांट, व ईतर समस्यांबाबत ना.नितीन गडकरींना अवगत करून दिले असता,त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या निकाली काढण्याबाबत आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे.