Now Loading

टायगर श्रॉफने 'गणपत पार्ट 1' च्या शूटिंगला सुरुवात केली, सोशल मीडिया वर पोस्ट शेअर केली

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या आगामी 'गणपथ पार्ट 1' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. याची माहिती खुद्द टायगरने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने सांगितले की यूके शेड्यूलचे शूटिंग सुरू झाले आहे. टायगरने चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेननही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत. टायगर आणि क्रितीचा हा अॅक्शन ड्रामा पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
 

अधिक माहितीसाठी - TV 9