Now Loading

छत्तीसगडच्या सुकमा येथे CRPF जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला, 4 ठार, 3 जखमी

छत्तीसगडमधील सुकमा येथे सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला. यादरम्यान सीआरपीएफचे ४ जवान शहीद झाले आहेत. तर ३ जवान जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, मरईगुडा पोलीस स्टेशन परिसरातील लिगाम पल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पमध्ये दुपारी 1 वाजता ही घटना घडली. जखमी जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळी झाडणारा जवान रात्री ड्युटीवर होता. मात्र, त्याने गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार सैनिकांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता.