Now Loading

Lava चा पहिला 5G स्मार्टफोन Lava AGNI उद्या भारतात दाखल होईल, जाणून घ्या संभाव्य किंमत

देशांतर्गत स्मार्टफोन निर्माता Lava चा पहिला 5G स्मार्टफोन Lava AGNI अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यूजर्स स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर करण्यात आली. Lava AGNI 5G स्मार्टफोन भारतात उद्या म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी वर्च्युअल इव्हेंटद्वारे लॉन्च केला जाईल. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Lava AGNI 5G स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 SoC 5G प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यामध्ये Android 11, 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5000mah आणि अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात.
 

अधिक माहितीसाठी - TV 9