Now Loading

सोलापूर : झेडपी समाज कल्याण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रेड ; सभापतीच्या चेंबरमध्ये झाली कारवाई

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील दलित वस्ती योजनेच्या टेबल वरील कर्मचाऱ्याला लाच घेताना सोमवारी समाजकल्याण सभापतींच्या चेंबरमध्ये रंगेहात पकडण्यात आले. बसवेश्वर स्वामी कक्ष अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई समाज कल्याण सभापती यांच्या चेंबरमध्ये झाली. पंधराशे रुपये लाच घेताना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर समाज कल्याण सभापती यांचे पती कार्यालयातून पसार झाले. बसवेश्वर स्वामी हे मागील अनेक वर्षापासून समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधार योजना या टेबलवर होते, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या शेवटी सोमवारी लाच घेताना त्यांना पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजतात संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली.