Now Loading

कौशल विकास योजनेचे प्रशिक्षण

प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दिनांक 11 10 2021 पासून रेल कौशल विकास योजनाद्वारे विविध व्यावसायिक ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज दिनांक 08.11.2021 रोजी इलेक्ट्रिशन ट्रेडचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या 30 उमेदवारांना अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्र सिंह परिहार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. श्री परिहार यांनी अभ्यासक्रमाचा अनुभव आणि त्यांना अभ्यासक्रमातून मिळालेले ज्ञान याबद्दल विचारणा केली ज्यावर प्रतिक्रिया उमेदवारांनी सांगितले की त्यांना अभ्यासक्रमामुळे बरेच व्यावहारिक ज्ञान मिळाले आहे आणि नवीन विषय समाविष्ट करून दीर्घ कालावधिसाठी अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची विनंती केली. रेल कौशल विकास योजनेअंतर्गत पुढील तीन वर्ष प्रशिक्षण देण्यात येणार असून दीर्घ कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठीचा मुद्दा उच्च स्तरावर मांडला जाईल असे सांगण्यात आले. या कार्यक्रमात वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री जी पी भगत, सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री शेख मस्तान व श्री अनिल कुलकर्णी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्मिक विभागाचे मुख्य कल्याण निरीक्षक श्री अजय सावंत श्री सचिन बनसोडे श्री अक्षय गर्दने भर्ती विभागातील श्री संजीव कुमार, श्री रफिक शेख व प्रशिक्षक श्री कुलदीप यांनी विशेष मेहनत घेतली.