Now Loading

दिल्लीत डेंग्यूमुळे आणखी 3 जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 2700 च्या पुढे

दिल्ली-एनसीआरमध्ये डेंग्यूचा कहर वाढत आहे. दिल्लीत डेंग्यूमुळे आणखी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर डेंग्यूने मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 9 झाली आहे. तर एकूण बाधितांची संख्या 2700 च्या पुढे गेली आहे. 2017 नंतर एका वर्षात डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, गेल्या एका आठवड्यात 1,170 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर या महिन्यात 6 नोव्हेंबरपर्यंत 1,171 प्रकरणांची नोंद झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 1,196 प्रकरणे नोंदवली गेली.