Now Loading

जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मिळाले मोठे यश, TRF दहशतवादी हाफिजला अटक

जम्मू-काश्मीरमध्ये आज सुरक्षा दलांना दहशतवादाविरोधात मोठे यश मिळाले आहे. TRF दहशतवादी हाफिज अब्दुल्ला मलिक याला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान टीआरएफच्या सक्रिय दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले. दहशतवाद्यांकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान त्याने एका ठिकाणची माहिती दिली असून तेथे अन्य शस्त्रे लपवून ठेवली आहेत.