Now Loading

राजस्थान सरकारची मोठी घोषणा, सर्व शाळा आणि महाविद्यालये 100% टक्के सुरू होतील

राजस्थानमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. याशिवाय राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत आहे. कोरोनाचा कमी होत असलेला संसर्ग लक्षात घेता राजस्थान सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि कोचिंग संस्थांना 100 टक्के क्षमतेने शैक्षणिक उपक्रम राबविण्याची परवानगी दिली आहे. राजस्थानमध्ये अजूनही ५० टक्के क्षमतेने शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. मात्र सोमवारी गृहविभागाच्या आदेशानुसार १५ नोव्हेंबरपासून सर्व शैक्षणिक संस्था १०० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. या दरम्यान, कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.