Now Loading

तामिळनाडू: अतिवृष्टीमुळे 5 ठार, 14 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

तामिळनाडूमध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी हवामान खात्याने 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोमवारी राज्यात पावसाने दिलासा दिला. मात्र अनेक रस्ते पाण्याने भरलेले आहेत. तर अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत लोकांना अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संततधार पावसामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.