Now Loading

विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळयात, जन्म दाखल्यासाठी मागीतली अडीच हजार रूपयाची लाच

चंद्रपुर (गोंडपिपरी)- जन्म दाखल्यासाठी पैशाची मागणी करणा-या गोंडपिपरी पंचायत समितीच्या विस्तार अधिका-याला रंगेहाथ पकडण्यात आले.आज दि. 08 नोव्हे रोजी दुपारच्या सुमारास एसीबीच्या चंद्रपूर टिमने हि कार्यवाही केली. गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथील एका नागरिकाला जन्म दाखल्याची आवश्यकता होती.त्याकरिता त्याने पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी संजीव इनमुलवार यांच्याकडे रितसर अर्ज सादर केला.बरेच दिवस होउनही दाखला मिळाला नाही.यामुळे विचारणा केली असता दाखल्यासाठी अडीच हजार रूपयाची मागणी विस्तार अधिकारी इनमुलवार यांनी केली.तक्रारकत्र्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी एसीबी चंद्रपूर कडे तक्रार नांेदविली.     दरम्यान आज या प्रकरणी सापळा रचून अडीच हजार रूपयाची लाच घेतांना विस्तार अधिकारी संजीव इनमुलवार याला रंगेहाथ पकडण्यात आले.याप्रकरणाची पुढील कार्यवाही एसीबीचे झांबरे यांच्या मार्गदर्शनात बरडे हे करित आहेत.