Now Loading

महाविद्यालय,टपाल,बँकेसह शासकीय कार्यालयांत नागरिकांना प्रवेशाआधी करावे लागेल लसीकरण

**महाविद्यालय,टपाल,बँकेसह शासकीय कार्यालयांत नागरिकांना प्रवेशाआधी करावे लागेल लसीकरण** जिल्हाधिकारी मनीषा खत्री** नंदुरबार,कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्व बँक,टपाल कार्यालय आणि शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयामध्ये प्रवेशापूर्वी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. 18 वर्षांवरील विद्यार्थी ज्यांनी कोविड -19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.जे विद्यार्थी,विद्यार्थींनींनी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही.त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही.त्यांच्या करिता विद्यापीठाचे संबंधित संस्थाचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण पुर्ण करुन घ्यावे.  बँक व पोस्टाच्या ठिकाणी जे नागरिक भेट देणार आहेत.त्यांचे  लसीकरण झालेले नाही त्यांना लसीकरण केल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. बँक व्यवस्थापक तसेच पोस्ट प्रमुख बँक व टपाल कार्यालयाच्या जवळच्या लसीकरण केंद्रात जावून  नागरीकांना लसीकरणाबाबत निर्देश द्यावेत. शासकीय कार्यालय  निमशासकीय कार्यालय चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आणि बंदिस्त सभागृह, फटाके विक्री स्टॉलच्या ठिकाणी प्रवेशासाठी लसीकरण करणे आवश्यक असेल.ज्या नागरिकांनी लसीकरण केले नसेल त्यांना प्रवेश देण्यात येवू नये. त्यासाठी त्यांना लसीकरणासाठी निर्देश देण्यात यावेत.   जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथकांद्वारे बँक व टपाल,महाविद्यालय, परिसंस्था, विद्यापीठ ,शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय,चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आणि बंदिस्त सभागृह येथे अचानक तपासणी करण्यात येईल. व आदेशाचे उल्लंघन आढळल्यास जबाबदार धरण्यात येईल,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.