Now Loading

परमिट प्राप्त शेतकऱ्यांनी अनुदानावरील हरभरा व ज्वारी बियाण्याची उचल करावी • कृषि विभागाचे आवाहन

चिखली : शासनाच्या बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टल वर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अतंर्गत तसेच ग्राम बिजोत्पादन अंतर्गत हरभरा व गहू १० वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरण व ज्वारी १० वर्षा आतील व १० वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरणसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे उचल करणेसाठी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन निवड झालेल्या शेतकऱ्यांना परमिट दिलेले आहेत.    सदर परमिट व्दारे शेतकऱ्यांनी 10 नोव्हेंबर पर्यंत अनुदानावरील हरभरा व ज्वारी उचल करावी. तरी 10 नोव्हेंबर नंतर सदरचे परमिट बाद होणार आहे. त्यानंतर परमिट धारक ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित प्रमाणित बियाणे वितरणाचे बियाणे मिळाले नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील. तसेच त्याबाबत कुठलीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही.  गुरूवार 11 नोव्हेंबर पासून हरभरा 10 वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरण व ज्वारी 10 वर्षाआतील व 10 वर्षावरील अनुदानावरील सर्व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. शेतकऱ्यांच्या 7/12 वरील क्षेत्रानुसार 0.40 आर पासून ते जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणाअंतर्गत अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी, महाबीज वितरक , एन.एस.सी वितरक,  कृभको वितरक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांनी केले आहे. अनुदानीत दर प्रति किलो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य – हरभरा पिकासाठी 10 वर्षाआतील वाण 61 रूपये प्रति किलो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तृणधान्य –ज्वारी पिकासाठी 10 वर्षाआतील वाण 30 रू प्रति किलो व 10 वर्षावरील वाण 38 रू प्रति किलो, मालदांडी, फुले, वसुधा 10 वर्षावरील वाण 31 रूपये किलो, ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम— हरभरा बियाणे 10 वर्षावरील वाण 55 रूपये प्रति किलो व गूह 10 वर्षाआतील वाण 23 रूपये प्रति किलो व 10 वर्षावरील वाण 21 रूपये प्रति किलो