Now Loading

Infinix Note 11S स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने आपला नवीनतम स्मार्टफोन Infinix Note 11S लॉन्च केला आहे. हा फोन दोन प्रकारात सादर करण्यात आला आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 6.95 इंच फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी पॅनल, मीडियाटेक हेलियो G96 SoC प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mah बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट, Android 11 OS आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय मॉन्स्टर गेमिंग किट सोबत देण्यात आले आहे. कंपनीने Infinix Note 11S ची किंमत 6,999 Thai Baht ठेवली आहे. त्याची किंमत सुमारे 15,700 रुपये आहे.