Now Loading

चेन्नईत पावसाचा कहर, रेड अलर्ट केला जारी; पुद्दुचेरीमध्ये शाळा, महाविद्यालये बंद

पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आणि तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट होत आहे. पुदुक्कोट्टई, रमांथपुरम, कराईकलसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुद्दुचेरीमध्ये संततधार पावसामुळे 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. आंध्र प्रदेशातही पावसाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उद्या आणि परवा मुसळधार पाऊस पडू शकतो.
 

अधिक माहितीसाठी: Financial Express | The Indian Express | NDTV